मराठी उन्नती सामाजिक संस्था यांच्या “मराठी उद्योग समाज” या संस्थेचा वर्धापन दिन शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी साठ्ये कॉलेज मध्ये सायंकाळी ठीक ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे आणि सदर कार्यक्रमाला असंख्य छोटे मोठे उद्योजक उपस्थित राहणार आहेत आणि सदर उपक्रम हा व्यवसाय वृद्धी करीता पोषक वातावरण निर्माण करणे योग्य ते मार्गदर्शन आणि आवश्यक सहायता प्रधान करण्याच्या शुद्ध हेतूने प्रेरित आहे. कार्यक्रमाला मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपूर्ण/समूह विकास प्राधिकरणाचे नवनिर्वाचित मंत्री पदाचा दर्जा प्राप्त अध्यक्ष मा. आमदार श्री. प्रविणभाऊ दरेकर, शासनाच्या विविध योजनांची अचूक माहिती मिळावी यासाठी शासनाचे अधिकारी व मुंबई बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्यातील यशस्वी उद्योजक यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
सारांश एवढाच की आपल्याला व्यवसायाचे गुप्त धडे आणि सटिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी प्रयत्न करणे हा या संस्थेचा मुळ उद्देश आहे. चला तर मग काल दसऱ्यानिमित्त सोने लुटले उद्या उद्योग धांद्याविषयी चर्चा सत्राचे अस्सल सोने लुटूया.
आपण या आपल्यासोबत अन्य व्यावसायिकांना ही आपल्या सोबत घेवून या आणि एक मोठी विश्वस्तरीय व्यापारिक चैन बनवुया. आयोजक मराठी उन्नती सामाजिक संस्था सोबत आपण सारे.
अध्यक्ष श्री सुहास जी तावडे
कार्याध्यक्ष श्री सहदेव जी सावंत
आणि कमिटी.
मराठी उन्नती सामाजिक संस्था
(मराठी उद्योग सामाजिक संस्था)
नोंदणी क्रमांक : बृहन्मुंबई ०००१४५७/२०२४
द्वारा : श्री सुहास बाळकृष्ण तावडे, प्रज्ञा पुरी, शांतिनगर, सहार रोड क्रमांक १,